Posts

Showing posts from April, 2022

गुढी पाडवा, हिंदू द्वेष आणि षड्यंत्र !

Image
  गुढी पाडवा, हिंदू द्वेष आणि षड्यंत्र !         आज गुढी पाडवा ! हिंदूंच्या नववर्षाची सुरुवात. भारताच्या विविध प्रांतांमध्ये हा सण जरी वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जात असला तरी सगळ्यांची कारणे मात्र सारखी आहेत. आपल्याकडे अर्थात महाराष्ट्रात ज्याला आपण गुढी पाडवा म्हणतो, त्याच सणाला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात उगादी किंवा युगादी असे म्हणतात. अनेकांनी हि गोष्ट आश्चर्याची वाटू शकते, पण आपण जशी बांबूवर साडी लावून, लिंबाचा पाला, गाठ्या लावून गुढी उभी करतो तश्याच पद्धतीने तिथेही केली जाते. याच दिवशी, काश्मीर, मध्ये काश्मिरी हिंदू नववर्ष म्हणून नवरेह साजरा करतात तर सिंधी हिंदू आजच्याच दिवशी छेती चंद या नावाने त्यांच्या नववर्षाचे स्वागत करतात व मोठ्या प्रमाणात सण साजरा करतात ! हि एवढी प्रस्तावना द्यायची गरज का पडली ?  आपल्या महाराष्ट्राला जशी संस्कृतीच्या विशाल वृक्षाचा आशीर्वाद आहे त्याच पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या वाळवळीचा देखील श्राप आहे. गेली काही वर्षे, हिंदूंचे सण आले कि त्यांच्या विषयी अपप्रचार करणे, त्या सणाच्या मागची कारणे तोडून मोडून जगाला सांगणे आणि कधीही